7
-5-15
1)..
11-12 वर्षांपुर्वी बाबा पुरंदरेंना
महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर झाला होता.... त्या वेळी आम्ही धुळ्यात राहाता
होतो... पुंरंदरेंच 'जाणता राजा नाटक' धुळ्यात होणार असे जाहीर होताच आम्ही सगळ्या पुरोगामींनी कंबर कसली! नाटक
होऊच द्यायचे नाही, असे ठरले. मोर्चा, धरणे आदि आंदोलने सुरू झालीत. पण शेवटी पोलीस बंदोबस्तात नाटक सुरू जाले व
खुद्द पुरंदरे पोलीसांच्या गाडीतून (स्वरक्षणासाठी) येत होते व जात होते....
2)..
त्याकाळी धळे शहरातील पुरोगाम्यांनी
इतिहास घडविला होता ..... कारण तोपर्यंतचा
इतिहास असे सांगत होता की, प्रतिगाम्यांनी आक्षेप घेतला तर,
पुरोगाम्यांचे कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात होत होते किंवा रद्द केले जात होते........ मात्र पहिल्यांदाच असे घडत होते की, पुरोगाम्यांनी
आक्षेप घेतल्यावर प्रतिगाम्यांचा कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात होत होता व खुद्द पुरंदरे
पोलीसांच्या गाडीत सुरक्षित रहात होते.
3) आमचा धुळेकरांचा हा प्रताप पाहता समस्त महाराष्ट्रियन मनुवादी खवळले व
त्यांनी आम्हाला खिजविण्यासाठी शासनाकडून बाबा पुरंदरेंना 'महाराष्ट्र
भुषण' पुरस्कार जाहीर करवून घेताला....
4) त्याचवेळी माझे दोन लेख ‘दैनिक सम्राट’ मधून छापून येताच हा पुरस्कार मागे घेण्यात आला....
अर्थात हा आमच्या तत्कालीन चळवळीचा व आंदोलनाचा विजय होता....
मात्र आता हाच पुरस्कार पुन्हा पुरंदरेंना देण्यात येत असेल तर... विजय कोणाचा व पराभव कोणाचा ...???!!
* These two articles are in the PDF form and cannot inserted here...