फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ संचलितसत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ
दिनांकः- 9 मे 2016
महोदय,
सत्यशोधक ज्ञानपीठ हे समतावादी व विज्ञानवादी विचारांचा प्रचार-प्रसार करणारे विद्यापीठ आहे. आम्ही महापुरूषांच्या विचारांच्या आधारावर एक अभ्यासक्रम तयार केला असून पाठ्यक्रम पुस्तक छापतो. ही अभ्यासक्रम पुस्तके विद्यार्थ्यांना देतो व त्यावर आधारित 100 गुणांची परीक्षा घेतो. गेल्या 22 वर्षांपासून महाराष्ट्रात हा महाप्रबोधनाचा प्रकल्प सुरू आहे. बिहार, यु.पी. राज्यातील काही कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यावरून आम्ही त्यांना ही पाठ्यक्रम पुस्तके हिंदी भाषेतून दिली.
गेल्या महिन्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परीषद घेऊन माननीय प्रधानमंत्री मोदी यांना आवाहन केले की, ‘’अगर आप सच्चे बाबासाहब के भक्त है, तो उनकी एक किताब ‘ऍन्निहिलेशन ऑफ कास्ट’ (जातीसंस्था का विनाश) युनिव्हर्सिटी मे पाठ्यक्रम मे लगा दिजिए’’ हमने बिहार के कुछ फुलेआंबेडकराईट नेतागण से बात की। हमने उनको कहा की, ‘फुलेआंबेडकर जी की किताबों पर हम महाराष्ट्रा मे 22 साल से परीक्षाए ले रहे है। बाबासाहब आंबेडकर जी की 'Annihilation of Caste' इस किताब पर मराठी मे हमने कई बार परीक्षाए ली है। अब हम यह किताब हिंदी भाषा मे छापकर ऑल इंडिया लेव्हल पर परीक्षा लेना चाहते है। हम किताबे लेकर आपके बिहार मे आएंगे और लालू जी से कहेंगे की, इस किताब पर पुरे बिहार मे परीक्षा लिजीए, ताकी मोदीसाहब आपका अनुकरण कर के पुरे देश के युनिव्हर्सिटी मे इस किताब को पाठ्यक्रम बनाके परीक्षा लेंगे।
बिहारच्या कार्यकर्त्यांना ही कल्पना फारच आवडली आहे. Dr. बासाहेबांचे Annihilation of Caste (जातीसंस्थाका विनाश) व तात्यासाहेबांचे 'गुलामगिरी' ही दोन्ही पुस्तके एकाच बाईंडींगमध्ये हिंदी भाषेत पाठ्यपुस्तक म्हणून छापायचे आहे. या पुस्तकाच्या 5,000 प्रती छापून त्या मा. लालूजीं ना बिहारसाठी द्यायच्या आहेत व त्यावर परीक्षा घ्यायच्या आहेत. आपल्या या ज्ञानपीठासाठी आपण कोणतेही सरकारी अनुदान घेत नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पुस्तके छापण्यासाठी आपणासारखे दानवीर आम्हास मदत करीत असतात.
या पत्राद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की, हे पुस्तक छापण्यास आर्थिक सहाय्य करून प्रबोधन प्रकल्पास अखिल भारतीय होण्यास हातभार लावावा.
आपला विश्वासू,
प्रा. श्रावण देवरे
संस्थापक, सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ
Contact: 94 22 78 85 46
fapu.exam@gmail.com
प्रा. श्रावण देवरे
संस्थापक, सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ
Contact: 94 22 78 85 46
fapu.exam@gmail.com
